टाकळी ढोकेश्वर व कान्हुर पठार येथे चोरी

file photo
file photo

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर, नगर): टाकळी ढोकेश्वर येथे बुधवारी (ता. 4) पहाटे पाचच्या दरम्यान तीन दुकाने व कान्हुर पठार येथे एक सोन्याचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून पोबारा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी ढोकेश्वर मधील बसस्थानक परिसरात असणारे श्री मेडिकल, स्टेट बँके शेजारील साई मेडीकल व सार्थक हार्डवेअर अशी तीन दुकाने चोरट्यांनी फोडले आहेत. यामध्ये श्री मेडिकल मधून वहीत लपून ठेवलेले दोन हजार रूपये चोरी केले आहे. स्टेट बॅकेजवळ असणारे साई मेडिकलमधून चोरट्यांनी चिल्लर पळविली आहे. यामधील रोख रक्कमेसह एकूण किती ऐवज गेला याबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. या बसस्थानकावरील मेडिकलमधून चोरी करून चोरट्यांनी चोरी करताना वापरलेली चारचाकी घेवून पळून जात असताना गावातील इलेक्ट्रीक दुकानासमोरील पोलला धडक बसून दुकानाचा लोखंडी दरवाजा उखडून पडला आहे. हा पोल तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

श्री मेडिकलच्या दुकानात कटावणीच्या सहाय्याने शटर उचकाटून आतमध्ये प्रवेश करत असलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तोंडाला फडके बांधून चोरी केल्याने ओळख पटू शकली नाही. कान्हुर पठार येथील डहाळे ज्वेलर्स दुकान फोडले असून त्यांचा काहीही मुद्देमाल गेला नसल्याची माहिती समजली. दिवाळी पुर्व चोरांचे सत्र चालू झाल्याने पोलिसांचे गस्त चालू करण्याची मागणी बाजारपेठा असलेल्या गावांनी केली आहे.

हाती काही न लागल्याने एकाने खाल्ला चोरट्यांचा मार ...
कान्हुर पठार येथील डहाळे सोन्याचे दुकान पहाटे चार वाजता चोरट्यांनी फोडून तेथून निघून जाताना एका गावकऱयाने त्यांना पाहिले. त्यांनीही त्याला पाहीले असता त्यास त्यांनी मार दिला. हाती काहीच न लागल्याने त्यांनी त्यास मारले याची चर्चा दिवसभर गावात रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com