नोकरीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

श्रीरामपूर,(नगर) - प्रथम नोकरी देण्याच्या बहाण्याने, तसेच नंतर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत विधवा महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षण संस्थेच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अशोकलाल रतनलाल शहा (रा. टिंगरेनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. 

पुणे येथील एका नामांकित संस्थेच्या एकूण सात शाखा आहेत. त्यांपैकी तालुक्‍यातील एका गावात या संस्थेचे मुलींचे वसतिगृह आहे. बाहेरगावच्या एका 32 वर्षीय विधवा महिलेने संस्थेकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या वेळी संस्थेचे सचिव शहा याने महिलेस कार्यालयात बोलावून घेतले. नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी वसतिगृहात येऊन महिलेवर बलात्कार केला. महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास विरोध केला असता, तिचा राजीनामा लिहून घेतला, तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यास वैतागून संबंधित महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Web Title: nagar news Woman raped