नगर: जि. प. शाळा कोसळली; 3 विद्यार्थी ठार; 35 अडकले

सनी सोनावळे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नगर: नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, या शाळेत 35 विद्यार्थी अडकले आहेत. ही घटना आज (सोमवार) साडे चारच्या सुमारास घडली.

जेसीबीच्या साह्याने अडकलेल्या काही मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजली आहे.

नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती़ सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली़. त्यामुळे सुमारे 35 विद्यार्थी शाळेत अडकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून सांगण्यात आली़. काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली़.

जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जखमी मुलांवर तेथेच प्राथमिक उपचार केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: nagar news zp school Collapsed three student killed