
नगर : नगर-पुणे रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून लोक वाहनांसह येतात. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून नगरहून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून येणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे, असे आज पोलिसांकडून सांगण्यात आले.
यंदा राज्यभरातून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी 10 ते 12 लाख लोकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा जनसमुदाय खासगी बस, एसटी बस, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांतून येतो.
हेही वाचा - "क्रीडा'च्या खेळामध्ये कारवाई रखडली
पुणे-नगर महामार्गावर भीमा कोरेगाव ते पेरणे फाटा यादरम्यान वाहतुकीची
वारंवार कोंडी होते. त्यामुळे पुणे महामार्ग वाहतूक पोलिस व पुणे पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी रात्री बारापासून एक जानेवारी रोजी रात्री साडेदहापर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे.
अवश्य वाचा - त्यांच्या जन्मदिनी पुस्तकांचा मेळा!
पर्यायी मार्ग असा
- नगरकडून पुण्याकडे जाणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण मार्गाने पुणे व मुंबईकडे जातील.
- पुण्याकडून नगरकडे येणारी वाहने येरवडा-विश्रांतवाडीमार्गे आळंदी, चाकणमार्गे शिक्रापूर अशी पुढे येतील किंवा खराडी बायपासमार्गे हडपसर, पुणे-सोलापूर रस्त्याने केडगाव चौफुल्यामार्गे न्हावरे फाटा शिरूरकडे येतील.
- हडपसर येथून आळंदी, नगर, चाकण, लोणीकंद भागात जाणारी वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे येरवडा-विश्रांतवाडीमार्गे आळंदीकडे जातील.
वाचा - अध्यक्षपदासाठी राजश्री घुले
पार्किंग व्यवस्था अशी
- नगर, शिक्रापूरकडून जाणाऱ्या वाहनांसाठी ः पार्किंग क्रमांक एक - तोरणा पार्किंग बजरंगवाडी, पार्किंग क्रमांक दोन - जाधवनगर चाकण रोड, पार्किंग क्रमांक 3 - कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी.
- पुणे-लोणीकंदकडून येणाऱ्या वाहनांसाठी ः लोणीकंद कुस्तीचे मैदान (चारचाकी वाहने), शिवतेज ऑटो गॅरेजशेजारी शेतजमीन लोणीकंद (दुचाकी).
- आळंदीकडून येणारी सर्व वाहने ः संगमेश्वर हॉटेल, तुळापूर फाटा येथील मोकळ्या शेतजमिनी
- पी. एम. पी. एल. बस पार्किंग व बस डेपो, सरकारी वाहने ः ओ. पी. पिनाकिलशेजारी, हॉटेल श्रावणीसमोर मोकळ्या जागेत, पेरणे टोल नाक्याशेजारी
- डोंगरगाव, उरळी कांचनकडून येणारी वाहने ः पेरणे गावाच्या पाण्याच्या टाकीशेजारी
- आळंदी बाजूकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी ः लोणीकंद थेऊर रस्ता वढू खुर्द रस्त्यावरील मोकळी जमीन
- राखीव : खंडोबाचा मळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.