नागेश्वर तरूण मंडळ व कॉलेजच्या तरूणांनी केली पुरातन बारवेची साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पारनेर - नागेश्वर मंदीराजवळ असलेल्या अतीशय पुरातन अशा बारवेतील कचरा व गाळ काढण्याचे काम न्यू आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स माहाविध्यालायाच्या एन.सी.सी.ची मुले व नेहमी सामाजिक काम करणाऱ्या नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने केले. त्यामुळे ही बारव अता स्वच्छ, सुंदर व चकाचक दिसू लागली आहे. या कामाचे शहरातून कौतुक होत आहे.

शहरातील नागेश्वर मंदिराच्या बाजूलाच ही बारव असून, या बारवेत दरवर्षी ऊन्हाळ्यात लहान मुले पोहावयास शिकतात. शहरात पोहण्याचा तलाव नसल्याने ती कमतरता या बारवेने भरून काढली आहे. परंतु, गणपती उत्सव व नवरात्र सारख्या धार्मिक विधी नंतर या बारवेत निर्माल्य टाकले जाते. त्या मुळे बारवेत घाण होते. असे निर्माल्या टाकण्यास बंदी असूनही ग्रामस्थांकडून धार्मीक विधीच्या नावाखाली हे कृत्य नेहमी केले जाते.

अनेक वेळा स्थानिक नागरिक याबाबत विरोध करतात मात्र तरीही बारवेत हा धार्मिक कचरा टाकण्यात येत असतो. या बारवेची साफसफाई करावी अशी मागणी नगरपंचायतीकडे करूणही त्यांनी ती न केल्याने पावसाळ्यापूर्वी दरवर्षीं  पारनेर महाविध्यालयाचे विध्यार्थी व नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने या बारवेची साफ सफाई करण्यात येते ती सफाई यंदाही नुकतीच करण्यात आली आहे या ऊपक्रमाचे कौतुक होत आहे. 

महाविध्यालायाचे प्राचार्य रंगनाथ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एन. सी. सी.चे प्रा. भरत डगळे त्यांचे छात्र व नागेश्वर मित्र मंडळाचे विनोद गोळे,राजेंद्र म्हस्के,कल्याण थोरात व मनोज गंधाडे यांनी संयुक्त रित्या या बारवेची साफ सफाई केली.   

Web Title: Nageshwar Tarun Mandal and the college youths cleaned the old barve