विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा मिळेल : सहकारमंत्री देशमुख

subhash-deshmukh
subhash-deshmukh

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठीही मदत मिळेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले. 

मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर मंगळवारी, सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असा नामकरण सोहळा पार पडला. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख बोलत होते. याप्रसंगी जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण पाटील, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरु डॉ. एस.आय.पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.बी.घुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, गोपिचंद पडळकर, उत्तमराव जानकर, माजी महापौर अरुणा वाकसे, नगरसेवक चेतन नरोटे, माहेन डांगरे, अविनाश कोळी, निमिषा वाघमोडे, सुनिल बंडगर, संजय क्षिरसागर, समता गावडे, शिवाजी कांबळे, बाळासाहेब शेळके, अर्जुन सलगर, सुभाष माने, बाळासाहेब दोडतले, वामनराव माने, सोमनाथ वाघमोडे, कालिदास गावडे, धनाजी गावडे, शेखर बंगाळे, पवन पाटील, राज सलगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविका कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कोकरे यांनी केले तर आभार डॉ. घुटे यांनी मानले. 

भाजप सरकारने नामविस्ताराचे दिलेले आश्‍वासन निवडणुकीपूर्वी पूर्ण केले. लिंगायत समाजाच्याही मागण्या पूर्ण होतील. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र बजेट करण्याची सरकारकडे मागणी केली जाईल. राज्य सरकार धनगर समाजासोबत आहे. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री 

तत्कालीन महापौर अरुणा वाकसे यांनी प्रथम सोलापूर महापालिकेत नामविस्ताराचा ठराव पास केला आणि त्यानंतर समाजबांधवांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळाले. दिरंगाई झाली परंतु, आश्‍वासन सरकारने पूर्ण केले. नामविस्तार म्हणजे महापुरुषांचा गौरव होय. समाजाने संघटितपणे लढा दिल्यास सर्व मागण्या पूर्ण होतील. 
- प्रा.राम शिंदे, जलसंधारणमंत्री 

सरकार समाजासमाज फूट पाडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करीत आहे. 70 वर्षात धनगर समाजाला जे मिळाले नाही ते भाजप सरकारने साडेचार वर्षात करुन दाखविले. लिंगायत समाजाच्याही मागण्या पूर्ण होतील. 
- डॉ. विकास महात्मे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com