नाव तज्ज्ञ संचालकांचे सोय राजकीय कार्यकर्त्यांची 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी झाले तज्ज्ञ संचालक 
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम 13 (1 क) मधील सुधारणेच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शिवसेना, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना व पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी दिली होती. पक्षाचे काम करणारेच बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक झाले होते. याच तज्ज्ञ संचालकांनी त्या त्या बाजार समित्यांमधील कारभारा विरोधात सहकार व पणन खात्याकडे तक्रारी करण्यास सुरवात केली. तक्रारी करणारे आणि तक्रारीवर चौकशी करणारे भाजप, शिवसेनेशीच निगडित असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. 

सोलापूर : महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम 13 (1 क) मधील सुधारणेच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून बसविण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले होते. पणन कायद्यातील हीच सुधारणा रद्द करण्याची शिफारस महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिफारशीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 10 बाजार समित्यांतील 24 तज्ज्ञ संचालकांना आता घरचा रस्ता धरावा लागणार आहे. 

aschim-maharashtra/accident-between-bus-and-tractor-kolhapur-marathi-news-250886">हेही वाचा - एसटी चालकाचा सुटला ताबा अन.... 
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बाजार समितीत तज्ज्ञ संचालकाच्या जागा रिक्त आहेत. उर्वरित आठ समित्यांत प्रत्येकी दोन तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यात आले आहेत. सोलापूर व बार्शी बाजार समितीची उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने या दोन्ही समितीवर प्रत्येकी चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आले होती. उर्वरित समित्यांची उलाढाल पाच कोटींच्या आत असल्याने या समित्यांवर प्रत्येकी दोन सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील बाजार समित्यांत तज्ज्ञ संचालक म्हणून कोणा कोणाची नियुक्ती केली आहे याची माहिती राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधकांकडून घेतली आहे. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी तज्ज्ञ संचालकांची माहिती राज्याच्या सहकार विभागाला पाठविली आहे. 
हेही वाचा - पाण्यातील जडत्वामुळे शहरवासीयांना गंभीर आजाराची शक्‍यता 
सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती निहाय तज्ज्ञ संचालक या प्रमाणे : सोलापूर : शहाजी पवार, अशोक निंबर्गी, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, श्रीमंत बंडगर, बार्शी : राजेंद्र मिरगणे, बिभीषण पाटील, बाळासाहेब पवार, दीपक आंधळकर, कुर्डुवाडी : संजय कोकाटे व नागनाथ कदम, अकलूज : राजकुमार पाटील व सुधीर काळे, मोहोळ : अंकुश आवताडे, सतीश काळे, पंढरपूर : अनंत चव्हाण, अजय जाधव, दुधनी : सातलिंगप्पा परमशेट्टी, रामचंद्र बिराजदार, मंगळवेढा : राजाराम कालिबाग, सत्यजित सुरवसे, अक्कलकोट : प्रभाकर मजगे, अतुल कोकाटे, करमाळा : बजरंग शिंदे, रामा ढाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Named Expert Directors Facilitate Political Activists