Politics : राज्यापालांनी जनतेची माफी मागावी, त्यांना पदावरून तत्काळ हटवावे - नाना पटोले

'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो'
nana patole says on Governor Koshyari apologise to public
nana patole says on Governor Koshyari apologise to public
Summary

'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो'

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्याचं भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने समर्थन केलं आहे. (nana patole says on Governor Koshyari apologise to public)

nana patole says on Governor Koshyari apologise to public
हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल तर त्याला जेलमध्ये पाठवा - उद्धव ठाकरे

यासंदर्भात आता कॉंग्रसेचे नेते नाना पटोले यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यात ते म्हणतात, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांना राज्यपाल पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाशी आपण सहमत नसल्याची भूमिका घेतली आहे. याशिवाय भाजप नेते आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भाजपकडून या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचा सूर आला आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही यासंदर्भात हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल तर त्याला जेलमध्ये पाठवा, अशी सडेतोड भूमिका घेतली आहे.

nana patole says on Governor Koshyari apologise to public
Chitra Wagh : सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे १७ सेकंदात २७ शिव्या; वाघ यांचा राऊतांवर निशाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com