Chitra Wagh : सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे १७ सेकंदात २७ शिव्या; वाघ यांचा राऊतांवर निशाणा

'सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे..., त्यामुळे त्यांचे वर्ल्ड बुक ऑफ गिनीजमध्ये नोंद व्हायला हरकत नाही'
chitra wagh criticized to sanjay raut
chitra wagh criticized to sanjay raut

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईला (Mumbai) आर्थिक राजधानी (Financial Captila) करण्यात गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajsthan) समाजाचा सिंहाचा वाटा आहे, हे लोक मुंबईतून बाहेर पडल्यास मुंबई आणि ठाण्यात (Thane) पैसेच उरणार नाही असे कोश्यारी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. (chitra wagh criticized to sanjay raut on governor koshyari on mumbai statement)

यासंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. वाघ यांनी ट्वीट केलं आहे. यात वाघ म्हणतात की, सर्वज्ञानींचे अभिजात मराठी म्हणजे १७ सेकंदात २७ शिव्या. वर्ल्ड बुक ऑफ गिनीजमध्ये नोंद व्हायला हरकत नाही, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.

chitra wagh criticized to sanjay raut
Politics : नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन, म्हणाले.. 'कोणाचाही अपमान झालेला नाही'

राज्यपाल कोश्यारींच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचं आमदार नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे. त्या त्या समाजाला त्यांच्या योगदानाचं श्रेय दिलं पाहिजे, राज्यपाल यांनी वक्तव्यातून हेच स्पष्ट केलं आहे. राज्यपालांकडून कोणाचाही अपमान झालेला नाही, त्यांनी त्या त्या समाजाला योगदानाचं श्रेय दिलं आहे, असं त्यांनी ट्वीट करुन स्पष्ट केलं आहे.

chitra wagh criticized to sanjay raut
Amit Shaha : देशात 4 ठिकाणी NCB तीस हजार किलो ड्रग्ज जाळणार, अमित शहा असणार 'साक्षीदार'

राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हणाले खासदार राऊत ?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारी यांचा व्हिडीओ ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे का? असा सवाल केला आहे. यात ते म्हणाले की, थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनीही केला नव्हता..मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना... की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..दिल्ली पुढे किती झुकताय? असेही राऊत म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com