अवलीयाच्या धाडसाला सलाम! महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना वाचवलं

अवलीयाच्या धाडसाला सलाम! महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना वाचवलं
Updated on: 
Summary

महापूर आला की शिरगावची अवस्था समुद्रातील बेटासारखी होती. सर्व मार्ग बंद होतात. लोकांना होडीतून बाहेर काढणे एवढाच पर्याय असतो.

नवेखेड (सांगली): शिरगाव तालुका वाळवा येथील तरुण कार्यकर्ते नंदकुमार पाटील यांनी यांत्रिक बोटीच्या साह्याने महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना ने आण करण्याचे काम करीत महापुरात मोठे योगदान दिले त्या अवलीयाच्या धाडसाला सलाम. खरं तर नदी, पाणी आणि होडी याचं जिव्हाळ्याचं नात शिरगावकराशी आहे. गावातील बहुतांश लोकांना होडी चालविण्याचे प्राथमिक ज्ञान आहे. परंतु इतर वेळी होडी चालविणे वेगळे आणि महापुरात चालविणे वेगळे त्यासाठी धाडस महत्वाचे. महापूर आला की शिरगावची अवस्था समुद्रातील बेटासारखी होती. सर्व मार्ग बंद होतात. लोकांना होडीतून बाहेर काढणे एवढाच पर्याय असतो.

याच गावातील नंदकुमार पाटील वाळव्यात शीट कोचिंग चा व्यवसाय करतात. नंदकुमार पाटील हे पट्टीचे पोहणारे आहे. होडी चालविणे त्यांची सवय आणि आवड आहे. २०१९ चा महापूर आल्यानंतर जिल्हापरिषद मार्फत नदी काठावरील गावात यांत्रिक बोट देण्यात आल्या.अनेक गावांत या होड्या वापराविना पडल्या आहेत. गावात महापुराचे पाणी शिरल्यानंतर बोटीतून बाहेर पडणे वेगळे. कारण ती बोट गावातच चालते. परंतु महापुराच्या वाहत्या पाण्यात थेट यांत्रिक बोट चालवून लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात आणणे हे मोठे अवघड काम असते. परंतु नंदकुमार पाटील निस्वार्थीपणे जीवावर उदार होऊन त्यांनी हे काम केले.

अवलीयाच्या धाडसाला सलाम! महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना वाचवलं
सांगली महापूरानंतर आता चिखलाचं साम्राज्य; पाहा व्हिडिओ

ते म्हणाले, गुरुवारी रात्री अचानक पाणी वाढले. नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला. बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते. तेव्हा यांत्रिक बोटीतून महिला, वृद्ध, मुले याना प्राधान्याने बोटीतून बाहेर काढले. एकावेळी १८ ते २० जणांना प्रवास करता येतो. ही बोट गावात आल्यानंतर मोठ्या उत्सुकतेने मी त्याची माहिती घेतली व ती चालवू लागलो. आमचं सर्व आयुष्य पाणी महापूर यात गेल्याने मला त्याची भीती वाटत नाही. शिरगाव मधून बाहेर पडताना जवळपास सहाशे व गावात येताना चारशे लोकांना या बोटीतून ने आन करण्याचे काम केले.

अवलीयाच्या धाडसाला सलाम! महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना वाचवलं
कोल्हापूर-सांगली महामार्ग सुरू; उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी

शिरगाव मधून निघालेली ही बोट थेट सिद्धेश्वर मंदिरापासून कृष्णेचें विस्तीर्ण पात्र पार करीत वाळवा हालभागावरील ओढ्यातून मार्ग काढत वाळवा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे लागत असे. हे अंतर जवळ पास पावणे दोन किलोमीटर इतके आहे. दोन्ही काठावर होडी आल्यानंतर शिरगाव मधील तरुणांनी बोटीतील लोकांना उतरून बाहेर घेणे आणि आत चढविणे यासाठी मोठे काम केले.

अवलीयाच्या धाडसाला सलाम! महापुरातून एक हजाराहून अधिक लोकांना वाचवलं
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

महापुराच्या निमित्ताने लोकांची सेवा करण्याची एक संधी मिळाली ते माझ्यासाठी देव आहेत.

- नंदकुमार पाटील, यांत्रिक बोट चालक शिरगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Marathi News Esakal
www.esakal.com