संकेश्वरजीक अपघातात नांगनूरची महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident
संकेश्वरजीक अपघातात नांगनूरची महिला ठार

संकेश्वरजीक अपघातात नांगनूरची महिला ठार

संकेश्वर : येथील महामार्गावर( highway) हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यानजिक (Hiranyakeshi Cooperative Sugar Factory)रस्ता पार करताना कारने ठोकरल्याने महिला ठार झाली. मालुताई अप्पासो नासीपुडे (वय 58, रा. नांगनूर ता. गडहिंग्लज) असे महिलेचे नाव आहे. तर शोभा शिवाजी रेडेकर (वय 60 रा. नांगनूर ता. गडहिंग्लज) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला गडहिंग्लज येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात बुधवारी (ता. 22) दुपारी 2.30 वाजता झाला.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मालुताई नासीपुडे व शोभा रेडेकर यांच्यासह अनेक महिला संकेश्वरात सुरु झालेल्या पंचकल्याण कार्यक्रमाला आल्या होत्या. पहिल्या सत्रातील कार्यक्रम संपवून परत नांगनूरला जाताना महामार्ग ओलांडताना चिक्कोडीकडून बेळगावकडे जाणारया कारने (केए 25, एमए 1222) या दोघींना ठोकरल्याने दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ गडहिंग्लजला घेऊन जाताना रस्त्यातच मालुताई हिचे निधन झाले. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. मयत मालुताई नासीपुडे हिच्या मागे मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. या घटनेमुळे नांगनूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी संकेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी, हवालदार चिचेवाडी यांनी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :Paschim maharashtra