मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचा टेंभा मिरवू नये : राणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नोटाबंदीमुळे सर्वसामान्याना नाहक त्रास सोसावा लागला. नोटाबंदीनंतर भाजपच्याच मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपये सापडले. त्याबद्द्ल कोणी बोलत नाही. सोलापुरातील मंत्री असलेले दोन्ही देशमुख एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढण्यात मग्न आहेत.

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेले अनेक मंत्री माझ्याही मंत्रीमंडळातही होते. एखादा निर्णय घेण्यासाठी ते किती पैसे घेत याची यादीच माझ्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचा टेंभा मिरवू नये, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यानी लगावला.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार प्रणिती शिंदे व उज्ज्वला शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. राणे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर चौफेर टिका केली. 

नोटाबंदीमुळे सर्वसामान्याना नाहक त्रास सोसावा लागला. नोटाबंदीनंतर भाजपच्याच मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपये सापडले. त्याबद्द्ल कोणी बोलत नाही. सोलापुरातील मंत्री असलेले दोन्ही देशमुख एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढण्यात मग्न आहेत. त्यामुळे सोलापुरचा विकास मागे पडला आहे. पंतप्रधानाना दुसऱ्याच्या बाथरुममध्ये डोकावण्याशिवाय दुसरे काम राहिले नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

Web Title: Narayan Rane criticize Devendra Fadnavis