दत्त जयंंती उत्सवाने नृसिंहवाडी फुलली

जितेंद्र आणुजे
रविवार, 16 डिसेंबर 2018

नृसिंहवाडी - दत्त जयंती उत्सवाचा आज तिसरा दिवस, मौनी स्वामी महाराज यांची पुण्यतिथी व मार्गशीर्ष रविवार यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

नृसिंहवाडी - दत्त जयंती उत्सवाचा आज तिसरा दिवस, मौनी स्वामी महाराज यांची पुण्यतिथी व मार्गशीर्ष रविवार यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

श्री दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी आज पहाटे चार वाजल्यापासून गर्दी होती. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. तसेच  मिठाई खरेदीसाठी भाविकांची दुकानात झुंबड उडाली. चार चाकी पार्किंग खचाखच भरलेले होते. दोन चाकी वाहने पार्किंग याचा नेहमी प्रमाणे बोजवारा उडाला.  

22 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या भक्ती भावाने होणाऱ्या दत्तमंदिरातील जन्मकाळ सोहळा यासाठी अडीच ते तीन लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.  पुणे, मुंबई येथील भाविकांनी येथे मुक्काम थाटला आहे. आज दिवसभरामध्ये मंदिरात लघु रुद्र, पंचामृत अभिषेक, महापूजा, दुपारी कीर्तन, जागरण, पालखी सोहळा रंगला. तसेच धार्मिक कार्यक्रम मनोभावे पार पडले.

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दत्त देवस्थान चे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव गुंडू पुजारी यांच्या पुढाकाराने स्वतंत्र तीन दर्शन रांगेचे नियोजन केले आहे.

मंदिर परिसरात कापडी सभामंडप उभे केले असून आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे नियोजन केले आहे. दत देवस्थानच्या दवाखान्यातून आरोग्य सेवा व स्वच्छ पिण्याचे पाणी यांचे नियोजन केले आहे. क्लोज सर्किट टीव्ही वरून धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जात आहे.

- विकास पुजारी, अध्यक्ष, दत्त देवस्थान

चार चाकी पार्किंगसाठी बस स्थानकाच्या मागे पार्किंग झोन, जगदाळे कॉलेज परिसर, नियोजित मोरबाळे त्री स्टार हॉटेल येथील जागेत तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपली शेत जमीनी सपाटीकरण करून पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री चा जन्मकाळ सोहळा बाबीस डिसेंबर रोजी सायंकाळी मंदिरात ब्रह्मवूरदाचया साक्षीने व मानकरी महेश पुजारी, राजू पुजारी, रूपेश पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी अडीच ते तीन लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

Web Title: Narsinhwadi Datta Jayanti Festival