दोन विद्यार्थ्यांनीच केला विद्यार्थ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नातेपुते, (जि. सोलापूर) - पिरळे (ता. माळशिरस) येथे दोन मित्रांनी आपल्याच मित्राचा शाळेत सराव परीक्षा चालू असताना ऊस तोडणीच्या कोयत्याने मानेवर घाव घालून निर्घृण खून केला. येथील समता माध्यमिक विद्यालयात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. महेश किसन कारंडे असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या खुनाची बातमी पिरळे गावात वाऱ्यासारखी पसरली व गावकऱ्यांनी शाळेसमोर एकच गर्दी केली होती. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील किसन महादेव कारंडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अल्पवयीन आरोपींवर 302, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. खुनानंतर दोघेही फरार झाले आहेत.
Web Title: natepute news solapur news student murder