#NationalNaturopathyDay पद्माळेत सामूहिक माती स्नान

#NationalNaturopathyDay पद्माळेत सामूहिक माती स्नान

सांगली - पद्माळे (ता. मिरज) येथे राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त सामूहिक माती स्नानाचे आयोजन केले होते. कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालय व दिल्ली येथील  इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जय भगवान योग परिवार, योग मित्र पदमाळने हा उपक्रम राबविला.

सकाळी दहा वाजता उपक्रमास प्रारंभ झाला. योग विशारद मोहन जगताप यांनी माती स्नानाचे आयुर्वेदिक महत्त्व सांगितले. निसर्गोपचाराची प्रार्थना म्हणण्यात आली. नदी काठच्या गाळ मातीत मातीत मोठ्या प्रमाणात चिखल करण्यात आला. त्या चिखलात सर्व सहभागिनी माती स्नानाचा आनंद घेतला. माती स्नानानंतर अर्धा तास सूर्यस्नान झाले. त्यानंतर नदीत जलस्नान करण्यात आले. देशात सर्वच राज्यात एकाच वेळी हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे लाईव्ह व्हिडीओ शूटिंग केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रथमच झालेल्या माती स्नानामध्ये 102 जणांनी सहभाग नोंदविला. सांगली, कराड, इस्लामपूर, किर्लोस्करवाडी, मधील निसर्ग प्रेमी यामध्ये सहभागी झाले. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी आदित्यराज घोरपडे, एनसीसी ऑफीसर नवनाथ लाड, श्री गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी, हिंदी अध्यापक संघाचे नेते आशिष यमगर, सुहास व्हटकर, शुभम जाधव, विठ्ठल काळेल, निलेश जगदाळे, सुशांत पाटील, शैलेश पाटील, हरिभाऊ साळुंखे ,पद्मालकर,आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com