खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी मागणी

खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी मागणी

कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खेकड्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिवरे धरण फुटीवर जलसंधारण मंत्री यांनी तिवरे धरण हे खेकड्यानी फोडलं असे बेजबाबदार विधान करत 23 मृत लोकांचा अपमान केला असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून म्हटले आहे. 


मुख्यमंत्र्यांनी खेकड्याला तातडीने अटक करुन 302चा गुन्हा दाखल करावा या मागणीठी कोल्हापुर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुर येथील शाहुपुरी पोलिस स्टेशनला जाऊन खेकड्यावर 302चा गुन्हा तातडीने दाखल करण्यात यावा यासाठी मागणी केली. पोलिस स्थानकात यासंबधी रितसर तक्रारही देण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रोहीत पाटील, अदिल फरास, महेन्द्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com