नवरात्रोत्सवात "गायत्री-स्वरूप', "त्रिपुरा सुंदरी'सह सालंकृत पूजा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - यंदाच्या नवरात्रोत्सवातही श्री महालक्ष्मीच्या विविध सालंकृत पूजा बांधल्या जाणार असून, त्रिपुरा सुंदरी, गायत्री-स्वरूप, बाला सुंदरी अशा विविध पूजांचा त्यात समावेश आहे. याबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती उद्या (ता. 28) प्रसिद्ध केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, आर्द्रता समिती, श्रीपूजक आणि फूल विक्रेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील आर्द्रता कमी
करण्यासाठी कमी आकाराचे आणि कमी वजनाचे हार पूजेसाठी वापरण्याचा निर्णय झाला. 

दरम्यान, गेली चार दिवस गाभाऱ्यात लावलेले ऑईलपेंटसह अन्य रंग काढण्याचे काम आजपासून बंद ठेवले. देवस्थान समितीच्या तक्रारीवरून हे काम बंद केल्याचे सांगण्यात आले; मात्र समितीने कुठलीही तक्रार केली नसल्याचा खुलासा केला. 

गाभाऱ्यात लावलेले ऑइलपेंटसह अन्य रंग काढण्याच्या कामास पुरातत्त्व खात्याने परवानगी दिली आहे. हे रंग काढल्यास आर्द्रतेचे प्रमाण निश्‍चितच कमी होणार आहे. रंग काढण्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार असून, सेंद्रिय पद्धतीचा वापर केला जात आहे. श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महालक्ष्मीच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन केल्यानंतर गर्भगृहाच्या हवेतील आर्द्रता कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू केले. यामध्ये फुलांचे प्रमाण कमी केले. आर्द्रतेच्या स्थितीचा सतत आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी अत्याधुनिक यंत्रणाही बसविली आहे. 

आर्द्रता समितीच्या आज झालेल्या बैठकीत कमी आकाराचे व कमी वजनाचे हार, गाभाऱ्यातून सर्व हार शक्‍य तितक्‍या लवकर बाहेर नेणे, गाभाऱ्यात पाण्याची साठवणूक पूर्णपणे बंद करण्याबाबतचे निर्णय झाले. देवस्थान समितीच्या संगीता खाडे, उदय गायकवाड, डॉ. पी. डी. राऊत, सुदेश देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Navaratrotsava the Gayatri-form worship