#NavDurga आम्ही ‘स्वयंसिद्धा’ नारी ड्रायव्हिंगलाही लय भारी! - राजलक्ष्मी पोवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - ‘आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी’ असं अभिमानगीत आम्ही नेहमीच म्हणतो; पण, त्याच्याही पुढे जाऊन आता ‘आम्ही ड्रायव्हिंगलाही लय भारी’ असं आवर्जुन सांगावंसं वाटतं... हो मी चालवते टेम्पो, मोबाईल व्हॅनही...सगळे आश्‍चर्याने बघतात आणि प्रोत्साहनही देतात...राजलक्ष्मी रामचंद्र पोवार संवाद साधत होती

कोल्हापूर - ‘आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी’ असं अभिमानगीत आम्ही नेहमीच म्हणतो; पण, त्याच्याही पुढे जाऊन आता ‘आम्ही ड्रायव्हिंगलाही लय भारी’ असं आवर्जुन सांगावंसं वाटतं... हो मी चालवते टेम्पो, मोबाईल व्हॅनही...सगळे आश्‍चर्याने बघतात आणि प्रोत्साहनही देतात...राजलक्ष्मी रामचंद्र पोवार संवाद साधत होती. तिच्यातील दुर्दम्य आत्मविश्‍वास चेहऱ्यावर तितकाच झळकत होता आणि तिच्या संवादातून तिच्या प्रवासाचे एकेक पैलू उलगडत होते.

उचगाव (ता. करवीर) गावच्या राजलक्ष्मीला शाळेत असल्यापासून ॲथलेटिक्‍सचं वेड. साहजिकच ती अभ्यासात कमी आणि खेळात अधिक रमली. रायफल शूटिंगही तिच्या आवडीचं. घरचा दुधाचा व्यवसाय. त्यामुळं घरी टेम्पो आहे. मग ती टेम्पोही शिकली आणि तो चालवूही लागली. येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या कामातही ती सक्रिय असते. ही संस्था म्हणजे ‘कॅन डू फिलिंग’ मी करीनच, अशी जिद्द प्रत्येक महिलेत निर्माण करणारी. प्रबोधन, प्रशिक्षण आणि स्वयंनिर्भरता या त्रिसूत्रीच्या जोरावर या संस्थेने आपली ओळख सातासमुद्रापार नेली आहे.

महिला सबलीकरणासाठी आंदोलने, मोर्चा आणि शासनाकडे भीक मागण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर महिलेने स्वयंनिर्भर व्हावे, हाच या संस्थेचा उद्देश. साहजिकच संस्थेशी संपर्क आल्यापासून राजलक्ष्मीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी पैलू पडत गेले. संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले. संस्थेच्या सभासद महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांना शहरातील विविध ठिकाणी मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी मोबाईल व्हॅन घेतली आणि या व्हॅनची चालक म्हणून राजलक्ष्मीवर जबाबदारी दिली गेली. ही व्हॅन घेऊन राजलक्ष्मी शहरातील विविध ठिकाणी फिरते. ज्यावेळी व्हॅन एका जागेला थांबून असते. त्यावेळी ती अभ्यासावरही भर देते. भविष्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून तिला अधिकारी व्हायचं आहे आणि ते स्वप्न साकारण्यासाठी संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांचे तिला खमकं पाठबळ आहे. 

Web Title: NavDurga Rajlaxmi Powar interview

टॅग्स