नवरात्रीमुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल

सातारा - नवरात्रीमुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल आहे.
सातारा - नवरात्रीमुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल आहे.

सातारा - नवरात्रातील उपवासामुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल वाढली आहे. मात्र, दरात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उपवास करणाऱ्या महिलांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. देशी फळांबरोबर परदेशातील फळेही बाजारपेठेत दाखल झाली आहे. 

नवरात्राच्या कालावधीत महिला नऊ दिवस कडक उपवास करतात. अनेक महिला नऊ दिवस भोजन न घेता फक्त फलाहार करतात. काही महिला एक वेळ जेवण व एक वेळ फळांचा आहार घेतात. त्यामुळे साहजिकच नवरात्रात फळांना मागणी वाढते. गणेशोत्सवापासून ही मागणी वाढलेली असते. यावर्षी नवरात्रातील मागणी पाहून विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर फळे विक्रीस आणली आहेत. मागणी जास्तच असली तरी किमती मात्र, गौरी-गणपती उत्सवातीलच राहिल्या आहेत. काही महिला फराळासाठी एक वेळ शाबुदाणा वापरतात. त्यामुळे किराणा दुकानांतून शाबुदाण्यास मागणी वाढली आहे. शेंगदाण्याच्या किमतीही स्थिर आहेत. राजवाडा परिसर, बस स्थानक परिसरात सर्वत्र फळांचे हातगाडे उभे असलेले दिसतात.

नवरात्रात नव्या पाहुण्यांकडे फराळाचे ताट फळांनी भरून नेण्याची प्रथा आहे. त्यामुळेही मागणीत थोडी भरच पडली आहे. या उपवासात खजूरही खाल्ले जाते. सध्या खजूर त्याच्या प्रकाराप्रमाणे साधारण ७० ते २७० रुपये किलो आहे. या उपवासात रताळी, केळी आणि सफरचंदाचाच जास्त उपयोग केला जातो. 

तरुणाईचेही ‘अनवाणी’नवरात्र
अनेकवेळा तरुणाई भक्ती, देवावरील श्रद्धेकडे कमी वळतात, असा काहीसा आरोप होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत नवरात्रात तरुणाईची श्रद्धा वाढलेली दिसते. नवरात्रात श्रद्धेने चामड्याच्या वस्तू वापरत नाहीत. काही जण नऊ दिवस पायात चप्पल घालत नाहीत. ही श्रद्धा कॉलेजला जाणाऱ्या मुले व मुलींतही वाढली आहे. युवक-युवती बिनचप्पलच्या चालताना दिसतात. तर अनेक जण गावातील, शहराच्या चौकातील दुर्गामातांच्या आरतीस पहाटे हजेरी लावतात. 

फळांचे दर (किलो) रुपयांत
सफरचंद डेलिशियस-१०० ते २००, चिक्कू-८० ते १००, मोसंबी-८० ते १००, संत्री-१०० ते १४०, डाळिंब -१०० ते १२०, पेरू-८० ते १००, पेर- १८० ते २००, अननस - ५० ते ६० एक नग, रताळी - ३० ते ४०,  केळी -४० ते ५० रुपये डझन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com