अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

चंद्रकांत देवकते
रविवार, 29 जुलै 2018

मोहोळ : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले.  

ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा निरीक्षका तथा राज्य प्रदेश सचिव निर्मला बावीकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील होते . 

यावेळी  पंचायत समितीच्या माजी  सभापती रजनी कांबळे , संगीता पवार , पंचायत समिती सदस्या संगीता पवार नगरसेवीका अर्चना वायचळ , यांच्यासह नगराध्यक्ष रमेश बारसकर , तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे , उपाध्यक्ष हेंमत गरड , कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नागेश साठे , नगरसेेेवक संतोष खंदारे , संतोष सुरवसे , आण्णा फडतरे , विकास कोकाटे, सुदर्शन कादे, शहर युवकचे अध्यक्ष एजाज तलफदार , आदीही  मान्यवर उपस्थित होते .  शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा यशोदा कांबळे ,कामीनी चोरमले , कल्पना खंदारे , आदींनी या शिबिराचे आयोजन केले होते .  

या शिबिरामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ .पी.पी . गायकवाड , डॉ प्रवीण खारे , डॉ .बी .डी .गवाड ,  डॉ हरणमारे ,डॉ अपरीन खान , डॉ तहसिन हांजगीकर आदी डॉक्टराच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित रुग्णांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन , रक्तातील साखरेचे प्रमाण , मोतीबिंदु आदीची तपासणी व उपचार करण्यात आले.

या शिबिरासाठी प्रामुख्याने अध्यक्षा यशोदा कांबळे यांच्यासह कामिनी चोरमले, कल्पना खंदारे, स्मिता कोकणे, मंगल नाईकनवरे , वर्षा दुपारगुडे , आदीनी परिश्रम घेतले .

Web Title: NCP Ajit Pawar Birthday Celebrations with Health Camp