राष्ट्रवादी, भाजपचे शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

चंदगड - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज दिवसभरात 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी आज अखेर 54 तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 97 असे एकूण 151 उमेदवारी अर्ज दाखल झाले. 

अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पंचायत समितीच्या आवारात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पंचायत समिती सभागृहात मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संपत खिलारे व सहायक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब समींदर यांच्या मार्गदर्शनाने आठ टेबलवर अर्ज दाखल करुन घेण्यात आले. दुपारी साडेतीनपर्यंत उमेदवारांची रांग होती. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप युतीच्या उमेदवारांनी रॅलीने येऊन शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. आघाडीचे नेते गोपाळराव पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर, अशोक पाटील, शंकर ओऊळकर, बाळाराम फडके, बी. डी. पाटील, नामदेव पाटील, बाबूराव हळदणकर, गोविंद पाटील, अरुण पिळणकर, आमीर मुल्ला, धैर्यशील सावंत भोसले, दत्तू कडोलकर, मधुकर सावंत, कलाप्पा नाईक, भैरू खांडेकर, राहुल देसाई आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोकुळचे संचालक राजेश पाटील, दीपक पाटील, सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, प्रभाकर खांडेकर, बाळाराम फडके, नितीन पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

राजगोळकर गटाची नाराजी 
कुदनूर पंचायत समिती गटातून भाजपकडून सौ. प्रेमा सिध्दाप्पा राजगोळकर यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. परंतु इथे जिल्हा परिषद राष्ट्रवादीसाठी तर पंचायत समितीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याने भाजप समर्थकांना उमेदवारी मिळाली नसल्याची नाराजी बोलून दाखवण्यात आली. 

Web Title: NCP, BJP's show of strength