शरद पवार म्हणाले, इथं निकाल आजच लागलाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

निवडणूक नेहमी सारखी नाहीये. या निवडणुकीला मी वेगळं महत्व आहे. महाराष्ट्राचा गाडा ओढणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा शेतकरी आहे. या बळीराजाकडे दुर्लक्ष करणाऱ्याच्या हातात आजची सत्ता आहे. त्यामुळे हि सत्ता उलथून टाकायचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.

विधानसभा इस्लामपूर : इथे प्रचाराची गरज नाही, निकाल आजच लागलाय. निकाल इथल्या लोकांच्या मनात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (मंगळवार) इस्लामपुरात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेत शरद पवर बोलत होते. प्रचाराची माझी पहिली सभा आज इस्लामपुरात होतेय आणि लोकांचा प्रतिसाद पाहता निवडणुकीचा निकाल आजच जाहीर झालाय. हाच निकाल सगळ्या महाराष्ट्रातही दिसेल.  

शरद पवार म्हणाले, की हि निवडणूक नेहमी सारखी नाहीये. या निवडणुकीला मी वेगळं महत्व आहे. महाराष्ट्राचा गाडा ओढणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा शेतकरी आहे. या बळीराजाकडे दुर्लक्ष करणाऱ्याच्या हातात आजची सत्ता आहे. त्यामुळे हि सत्ता उलथून टाकायचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar campaign rally in Islampur for Maharashtra Vidhan Sabha 2019