प्रभाग समित्यांसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सांगली - महापालिकेतील चारही प्रभाग समिती सभापतींच्या निवडी येत्या शनिवारी (ता. २९) होत आहेत. राज्यस्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादीत सध्या संघर्ष यात्रेनिमित्त एकीचे सूर निघत आहेत. त्याचीच री महापालिकेत ओढली जायची शक्‍यता आहे. चारही प्रभाग समित्यांत उपमहापौर गटाला सत्तेपासून दूर ठेवत दोन्ही काँग्रेस एकत्र येतील, अशी पालिका वर्तुळाच चर्चा आहे. 

स्थायी समिती सभापती निवडी काँग्रेसला धक्का देणाऱ्या उपमहापौर गटाच्या शेखर माने व त्यांच्या समर्थक नगरसेवकांना दूर ठेवून काँग्रेसमधील मदन पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील.

उपमहापौर गट आणि स्वाभिमानी आघाडीचे प्रभाग समिती एक व दोनमध्ये चांगले संख्याबळ आहे. थेट लढतीत ते या समित्यांच्या सभापतिपदी निवडणुकीत बाजी मारू शकतात. तथापि दोन्ही काँग्रेसने हातमिळवणी केली तर त्यांना सत्ताप्राप्तीत कोणताही अडथळा राहणार नाही. अशा स्थितीत निवडी बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 

महापौर बदलासाठी काँग्रेसमधील मदनभाऊ गटातील राजेश नाईक व रोहिणी पाटील यांनी उचल घेतली आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत हाच विषय केंद्रस्थानी होता. बदललेल्या राजकीय अवकाशात महापौर बदल हा केवळ काँग्रेस नेत्यांच्या इच्छेवर उरलेला नाही. उपमहापौर गटातील नगरसेवकांची भूमिका बदलाच्या बाजूने राहिली तरच हा बदल होऊ शकतो; अन्यथा काँग्रेसला महापौर बदलासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागेल. नेत्यांनी महापौर, उपमहापौर आणि गटनेतेपदही बदलले जाईल, असे जाहीर केले असले तरी यासाठी सर्व जुळणी कशी होणार, याचे उत्तर मात्र पतंगराव कदम यांच्याकडे नव्हते. त्यामुळे ‘संख्याबळ दाखवा आणि महापौर व्हा’, असा पर्याय पतंगरावांना द्यावा लागला होता. विजय घाडगे यांनी शेखर माने यांनी सांगितले तरच राजीनामा असे जाहीर केले आहे. श्री. माने यांची काँग्रेसमधून हाकलपट्टी झाल्याने आता नेत्यांनी महापौर व गटनेते बदलापुरतेच निर्णय करावे लागतील. दोन्ही काँग्रेस प्रभाग समित्यांच्या निवडीसाठी एकत्र आल्यास महापौर बदलाच्या मागणीला जोर येणार आहे. 

Web Title: ncp & congress compramise for ward committee