उमेदवारी अर्ज विक्रीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस लखपती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

697 अर्जांची विक्री, कॉंग्रेसकडूनही ठराविक रक्कम
सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 697 उमेदवारी अर्जांची विक्री करून त्यातून लखपती कमाई केली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसकडून अर्ज मोफत दिले जात आहेत; पण परत घेताना ठराविक रक्कम घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसच कमाई मात्र, निम्म्यापेक्षा कमी आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचा कोण कसा फायदा घेईल, सांगता येत नाही. विविध पक्षांनी उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयातच उपलब्ध करून इच्छुकांची सोय केली आहे; पण यातून पक्ष निधीच्या स्वरूपात लाखोंची रक्कम जमा केली जात आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर दिसते. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या जिल्ह्यात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या चार दिवसांत राष्ट्रवादी भवनात उमेदवार अर्ज विकत घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. आतापर्यंत 697 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. उमेदवारी अर्जासाठी काही विशिष्ट शुल्कही पक्ष निधीच्या स्वरूपात आकारला जात आहे. जिल्हा परिषदेसाठी खुल्या जागांच्या अर्जासाठी दहा ते सात हजार रुपये, तसेच राखीव जागांसाठी पाच ते तीन हजार रुपये घेतले जात आहेत. पंचायत समितीसाठी खुल्या जागेसाठी सात ते पाच हजार, तर आरक्षित जागेसाठी तीन ते दोन हजार रुपये शुल्क आकारला जात आहे.

कॉंग्रेमध्ये मात्र वेगळीच स्थिती आहे. कॉंग्रेस भवनासह तालुका कार्यालयात उमेदवारी अर्ज मोफत दिले जात आहेत. हे अर्ज परत स्वीकारताना जिल्हा परिषदेसाठी खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार रुपये, आरक्षित जागेसाठी अडीच हजार रुपये पक्ष निधी म्हणून आकारला जात आहेत. पंचायत समितीसाठी खुल्या प्रवर्गासाठी तीन हजार रुपये, तर आरक्षित जागांसाठी पंधराशे रुपये इच्छुकांकडून घेतले जात आहेत.

Web Title: ncp income in candidate for sailing