esakal | जयंत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

जयंत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल हे ट्विट केले. सांगली या जिल्ह्याच्या शहरापासून जयंत पाटील यांचे होम ग्राऊंड असलेल्या इस्लामपूरला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयणिय अवस्था आहे. त्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला होताच, शिवाय जयंत पाटील यांनी ‘सेल्फी वुईथ खड्डे’ काढलेला फोटो शेअर करत आता राज्यात तुमची सत्ता आहे, खड्डे मुजवा, अशी आठवण करून दिली होती.

जयंत पाटील यांच्या मतदार संघातून सांगलीला जोडणारा पेठ-सांगली रस्ता खूप वर्षे प्रलंबित आहे. हा आता पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा उपमार्ग ठरणार आहे. त्यामुळे तो केंद्राकडे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग झाला आहे. त्याचे काम रखडलेले आहे. जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये त्याचीही आठवण करून दिली आहे.

हेही वाचा: बेळगाव : महानगरपालिकेच्या मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

त्यांनी ट्विट केले आहे, की ‘पेठ-सांगली’ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने तो केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. तरीदेखील राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना सदर रस्त्यावर असलेले खड्डे मुरमाने भरून घेण्याची सूचना दिली आहे. त्याकरीता मुरुमदेखील उपलब्ध करून दिला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने डांबरीकरण करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.’

loading image
go to top