esakal | बेळगाव : महानगरपालिकेच्या मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक मार्गात बदल

बेळगाव : महानगरपालिकेच्या मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : महानगरपालिकेची मतमोजणी सोमवार (ता. ६) कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.के. मॉडेल हायस्कूलमध्ये होणार आहे. त्यामुळे या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सकाळी सहापासून शहरातील काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त पी. व्ही .स्नेहा यांनी दिली आहे.

हेही वाचा: वाहतूक नियमांचे उल्लंघन सांगलीकरांना पडले ७८ लाखांना

खानापूरकडून येणारी वाहने गोवावेस सर्कलकडून आणि काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिर येथून येऊन शौर्य चौक, गांधी सर्कल येथून पुढे जातील.

चेन्नम्मा सर्कलकडून खानापूरकडे जाणारी वाहने चनमा सर्कल येथील गणेश मंदिर येथून क्लब रोड मार्गे, बाची क्रॉस, गांधी सर्कल, शौर्य चौक त्यानंतर मिलिटरी महादेव मंदिर येथून पुढे जातील. पिंपळ कट्टा, पाटील गल्ली, शनी मंदिर मार्गावरून खानापूर रोडकडे जाणारी वाहने शनी मंदिर येथून वळण घेऊन कपलेश्वर ओव्हर ब्रिज एसपीएम रोड, बँक ऑफ इंडिया बसवेश्वर सर्कल येथून पुढे जातील.

हेही वाचा: सांगली: भाजप हाच काँग्रेसचा मुख्य विरोधक

निर्बंधित मार्ग-

  • खानापूर रोड (मंगसुळी खुट पासून गोगटे सर्कल पर्यंत)

  • सेंट पॉल स्कुल क्रॉस पासून गवळी गल्ली क्रॉस आणि हाय स्ट्रीट रोडपर्यंत.

  • बि. के. मॉडेल स्कूल रोड (पोस्टमन सर्कल बीएसएनएल पर्यंत) उमेदवार आणि येणाऱ्या एजंटांची वाहने असद खान दर्गा येथील खुल्या जागेत पार्क करावीत.

loading image
go to top