राष्ट्रवादी कॉंग्रेसचा स्वबळाचा नारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक नियुक्‍त केले असून, पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पक्षाच्या कार्यालयातून उमेदवारी मागणी अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 24 ते 29 नोव्हेंबरपर्यंत आहे. यासंदर्भात पक्षाच्या प्रदेश समितीने प्रत्येक जिल्ह्याचे निरीक्षक नियुक्‍त केले आहेत. कोल्हापूरसाठी निरीक्षक म्हणून दिलीप पाटील व जिल्हा निरीक्षक म्हणून अनिल साळोखे यांची निवड केली आहे. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी निरीक्षकाची नियुक्‍ती करण्याच्या सूचना जिल्हा समितीला दिली होती. त्याप्रमाणे कोल्हापुरातील नऊ नगरपालिकांच्या नऊ निरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली. त्यांची नावे अशी. कसांत नगरपालिकेचे नाव. बाबूराव हजारे (कागल), आमदार हसन मुश्रीफ (मुरगूड व गडहिंग्लज), पंडितराव केणे (मलकापूर), बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर (पन्हाळा), अरुणराव इंगवले (पेठवडगाव), प्रा. किसनराव चौगुले (जयसिंगपूर) व राजू लाटकर (कुरुंदवाड), युवराज पाटील (इचलकरंजी).
पक्षाच्या वतीने उमेदवारी मागणी अर्ज उद्या (ता.20) पासून पक्षाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ता. 24 नोव्हेंबरपासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी उद्या (गुरुवार) पासून पक्षाच्या कार्यालयातून उमदवारी मागणी अर्ज न्यावेत, असे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: ncp kolhapur municipal election

टॅग्स