Maharashtra Politics : जयंत पाटलांनी वाळव्याचा ताव दाखवला, पडळकरांच्या टीकेवर प्रकट मुलाखतीत म्हणाले; सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...

Jayant Patil Sangli : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाळव्यातील प्रकट मुलाखतीत गोपीचंद पडकरांच्या टीकेवर तावातावाने उत्तर दिलं.
Maharashtra Politics

Maharashtra Politics

esakal

Updated on
Summary

तीन ठळक मुद्दे (Highlights):

वादावर प्रथम प्रतिक्रिया: आमदार जयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबतच्या वादावर प्रथमच प्रतिक्रिया देत “क्या बडा तो सबसे दम बडा” या शब्दांत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

राज्य सरकारवर टीका: फडणवीस-शिंदे-पवार सरकारवर निशाणा साधत त्यांनी पूरग्रस्तांना मदत न देणं, वाढतं कर्ज आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा आर्थिक भार यावर टीका केली.

राजकीय संदेश आणि परंपरेचा आग्रह: त्यांनी स्पष्ट केले की “आमचा परिसर शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा आहे,” आणि नव्या पिढीने मूळे विसरू नयेत, हिंदुत्वात शूरपणा हवा, पण अहंकार नसावा असा संदेश दिला.

Sangli Political News : “क्या बडा तो सबसे दम बडा,” अशा भाषेत आमदार जयंत पाटील यांनी आज येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबतच्या वादावर प्रथमच भाष्य केले. त्याचवेळी त्यांनी “आपलं नाव ऐकलं नाय असं याक भी गाव नाय आणि सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...,” अशाही शब्दांत विरोधकांना कडक इशारा दिला. तुम्हाला राग येतो का, या प्रश्नावर त्यांनी नेहमीच्या ढंगात आपली प्रतिक्रिया नोंदवली. नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात आयोजित दसरा लोककला महोत्सवांतर्गत आयोजित ‘फोक आख्यान’ कार्यक्रमामध्ये झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

गेले काही दिवस भाजप आमदार पडळकर यांनी केलेल्या अश्‍लाघ्य टिकेनंतरही राज्यभर राजकीय धुरळा उडाला असताना जयंत पाटील यांनी मात्र मौन पाळले होते. आज या प्रकट मुलाखीच्या निमित्ताने आज प्रदीर्घ काळानंतर त्यांनी विविध विषयांवर जाहीर भाष्य केले. राज्य सरकारच्या विविध धोरणांवर शेलक्या शब्दांत टिका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com