कोल्हापूरः राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी महापाैरपदाचा पदभार स्वीकारला

कोल्हापूरः राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी महापाैरपदाचा पदभार स्वीकारला

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांची निवड झाली. निवडीनंतर मिरवणूकीला फाटा देत त्यांनी कार्यभारही स्विकारला.

महापाैरपदासाठी नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सौ. गवंडी यांचा एकमेव अर्ज सत्तारूढ गटाकडून दाखल झाला होता. सौ. गवंडी यांचे पती प्रकाश हे माजी नगरसेवक आहेत तर त्यांचे सासरे कै. आनंदराव गवंडी यांनी महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून काम केले आहे. 

महापालिकेत दोन्ही कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पाच वर्षात दोन्ही पक्षांची पदाची वाटणी झीा आहे. यावेळी महापौरपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला होते. तत्कालिन महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाची निवड प्रक्रिया सुरू होती. सुरूवातील राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या पत्नी सूरमंजिरी लाटकर यांचे नांव आघाडीवर होते. पण  लाटकर यांच्या नावाला राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी विरोध केला.लोकसभेच्या निवडणुकीत श्री. लाटकर यांनी श्री.महाडिक यांचा प्रचार न करता शिवसेना उमेदवारांचा प्रचार केला. तशी तक्रार श्री. महाडिक यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेच केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या 14 पैकी 12 नगरसेवकांनीही ऍड. लाटकर यांच्या नावाला विरोध केला. श्री. महाडिक यांची तक्रार आणि नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी लाटकर यांना डावलून सौ. गवंडी यांची उमेदवारी जाहीर केली. 

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा 28 जून हा अखेरचा दिवस होता. अर्ज संपण्याची अंतिम वेळ पाच वाजता होती, तत्पुर्वी 15 मिनिटांत घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सौ. गवंडी यांचे नांव लखोट्यातून आले. शहाराध्यक्ष आर. के. पोवार यांनीच या नावाची घोषणा केली आणि सारेच आवाक्‌ झाले. आज महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सौ. गवंडी यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर मिरवणूकीला फाटा देत त्यांनी कार्यभारही स्विकारला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र फटाक्‍यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत महापालिकेबाहेर एकच जल्लोष केला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com