राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; ज्येष्ठ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

- राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून सेना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आमदार आणि नेत्यांची चढाओढ सुरू

- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हातात बांधले 'शिवबंधन'. 

पंढरपूर : राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून सेना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आमदार आणि नेत्यांची चढाओढ सुरू आहे. असे असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हातात 'शिवबंधन' बांधले होते. त्यानंतर आता माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनीदेखील राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बबन शिंदे यांचे सलोख्याचे संबंध आजही कायम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार शिंदे भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना 'ग्रीन सिग्नल' मिळत नव्हता. मात्र, आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदेंना प्रवेश देण्यासाठी 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यानंतर शिंदेनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गटवार बैठका सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला जात आहे. एकूणच कार्यकर्त्यांचा मतप्रवाह विचारात घेता शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

नवी नियमावली सरकारच्या फायद्याची; चार दिवसांत 1.41 कोटींची वसूली

भुजबळांनी आज सर्व चर्चांना दिला पूर्णविराम

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA BABAN Shinde may Join BJP