esakal | फक्त अजित पवारांच्या नावाचीच चर्चा होते कारण... : सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

सुप्रिया सुळे यांनी विठ्ठल-रक्मिणीचे दर्शन घेतले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या यात्रांचे पेव फुटलेला आहे. आशातच आज संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. 

फक्त अजित पवारांच्या नावाचीच चर्चा होते कारण... : सुप्रिया सुळे

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर : बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने अजित पवारांसह इतर संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेला आहे. मात्र फक्त चर्चा अजित पवार यांच्या नावाची होत आहे. कारण त्यांच्या नावाला टीआरपी जास्त आहे, अशी खोचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुळे आज सकाळी श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांची मंदिरात भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून वर्षातून दोन वेळा तरी सुळे या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. आज तर त्यांनी श्रीविठ्ठलाचे एकदा मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यात जाऊन दुसऱ्यांदा दर्शन घेतले. यावेळी उपस्थित अनेक भाविकांनी सौ. सुळे यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी  सर्वसामान्य वारकरी आणी भाविकांची सौ. सुळे यांनी आपुलकीने चौकशी केली.

अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळात तर अर्धा महाराष्ट्र सुक्या दुष्काळात होरपळून निघाल्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु दुर्दैव आहै. हे असंवेदनशील सरकार यात्रा आणि प्रचारात व्यस्त आहे, त्यामुळे हे सरकार पोटाचे नसून व्होटाचे आहे अशी टीका सुळे यांनी केली.

सध्या राज्यात असणार भाजप शिवसेनेच सरकार हे लोकांच्या हिताचे नाही. लोकांच्या पोटाच सरकार नाही तर फक्त वोटाच सरकार आहे. सर्व सामान्य लोकांचे मतदान घेण्यापुरते सरकार आहे . त्यामुळे यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यातलं शेतकरीहित विरोधी असलेले हे सरकार जाऊन लोकांच्या हिताचे सरकार यावे, असे साकडे आपण विठ्ठलाला घातल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीपासून अंतर ठेवून भाजपशी जवळीक साधत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेली शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात येत असताना या यात्रेत सहभागी न होण्याच खासदार भोसले यांनी सांगितल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी उदयनराजे यांच्या या वक्तव्यावर अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिलेली आहे. मी सुद्धा यात्रेमध्ये सहभागी झालेले नाही असे म्हणत उदयनराजें बद्दल टीका करणं थेटपणे त्यांनी टाळला आहे.

loading image
go to top