शरद पवारांची कॉलर ‘पॉवर’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

और चाबी खो जाए...!
पत्रकार परिषद सुरू असताना संबंधित खोलीचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे आत शरद पवार, तर बाहेर सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आमदार अशी स्थिती झाली. लॉक तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या वेळी शरद पवारांनी ‘हम तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाए,’ या गीतातील ‘और चाबी खो जाए’ हे बोल बोलून गंभीर वातावरणात हशा पिकविला.

सातारा - खासदार-आमदार असा काही पेच निर्माण होत नाही. मी असलो की सगळे ठिक होते.  उतारा काढायची वेळच येत नाहीत. त्या वेळी सगळेच सरळ असतात. त्या वेळी ‘कॉलर’सुद्धा ‘सरळ’ असते, अशी मिश्‍कील टिप्पणी करत शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील खासदार-आमदारांतील पेचावर पडदा टाकला. एवढेच नाही तर पवार यांनी कॉलर उडवून दाखवून पुन्हा सरळ करूनही दाखविली.

साताऱ्यातील प्रश्‍नावर दिलखुलास उत्तरे पवार यांनी दिली. साताऱ्यात खासदार, आमदारांमध्ये पेच आहे, असा प्रश्‍न पत्रकारांनी केला. त्यावर केवळ शाब्दिक उत्तरे देण्यापेक्षा त्यांनी देहबोलीतून अधिक प्रभावीपणे उत्तरे दिली. खासदार उदयनराजे भोसले हे ‘कॉलर’ उडविण्यात माहीर असले तरी ती कॉलर ‘सरळ’ करण्यात आपण मास्टर असल्याचे खासदार पवारांनी बोलून दाखविले. 

और चाबी खो जाए...!
पत्रकार परिषद सुरू असताना संबंधित खोलीचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे आत शरद पवार, तर बाहेर सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आमदार अशी स्थिती झाली. लॉक तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या वेळी शरद पवारांनी ‘हम तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाए,’ या गीतातील ‘और चाबी खो जाए’ हे बोल बोलून गंभीर वातावरणात हशा पिकविला.

Web Title: NCP president Sharad Pawar's political power