राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘महामार्ग रोको’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नोटाबंदीच्या निषेधार्थ मोर्चा काढून वाढे फाटा येथे महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. पोलिसांनी ठिकठिकाणी लोखंडी बॅरिकेट्‌स लावून आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना जुगारून कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केले. 

नोटाबंदीनंतरची स्थिती हाताळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्ह्यात तालुकानिहाय मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवनापासून मोर्चाने जाऊन पदाधिकारी व कायकर्त्यांनी वाढे फाटा येथे महामार्ग रोको आंदोलन केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, ‘युवक’चे जिल्हाध्यक्ष नितीन भोसले, ऋषिकांत शिंदे, ‘विद्यार्थी’चे प्रदेश सचिव बाळासाहेब महामुलकर, ‘विद्यार्थी’चे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गोरख नलवडे, राजेंद्र लावंघरे, योगेश चोरगे, नगरसेवक बाळू खंदारे, पारिजात दळवी, फिरोज पठाण, अविनाश कदम, ज्ञानेश्‍वर गायकवाड, राजेंद्र भोसले, आनंदराव कणसे सहभागी झाले होते. 

पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी भवन ते वाढे फाटा या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेट्‌स लावले होते. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आमदार शिंदे व शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  महामार्ग रोको केला. त्यानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Web Title: ncp rally for currency ban protest