राष्ट्रवादीची साताऱ्यात, तर कॉंग्रेसची सांगलीत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उद्या (शुक्रवारी) साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात बैठक होत आहे, तर कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सांगलीत माजी मंत्री पतंगराव कदम, विश्‍वजित कदम यांच्या उपस्थित होणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षांची यादी अंतिम केली जाणार आहे. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उद्या (शुक्रवारी) साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात बैठक होत आहे, तर कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सांगलीत माजी मंत्री पतंगराव कदम, विश्‍वजित कदम यांच्या उपस्थित होणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षांची यादी अंतिम केली जाणार आहे. 

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी निश्‍चित कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उद्या (शुक्रवारी) राष्ट्रवादी भवनात ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत प्रत्येक गट, गणातील उमेदवारांची नावे निश्‍चित करून त्याबरोबरच एक ते दोन डमी उमेदवारही निश्‍चित केले जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झालेल्यांचे एबी फॉर्म त्या त्या तालुक्‍याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जाणार आहेत. 

दुसरीकडे कॉंग्रेसच्या यादीसंदर्भात आज मुंबईत प्रदेश कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे उमेदवार निश्‍चित करण्याची जबाबदारी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व युवक कॉंग्रेसचे नेते विश्‍वजित कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्याची यादी निश्‍चित करण्यासाठी सांगलीत बैठक होणार आहे. त्यानंतर रविवारी (ता. 5) ही यादी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

उदयनराजेंकडे लक्ष 
खासदार उदयनराजे कार्यकर्त्यांच्या संपर्काबाहेर असल्याने त्यांच्या सातारा विकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे; परंतु येत्या शनिवारी (ता. 4) ते जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांच्या निष्ठावंतांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उदयनराजे नेमके काय जाहीर करणार याचीच उत्सुकता आहे.

Web Title: NCP in Satara, Congress meeting Sangli