राम कदमांचा विषय माझ्या खात्याशी संबंधित नाही : तावडे

NCP women leader ask explanation about Ram Kadam to Vinod Tawade
NCP women leader ask explanation about Ram Kadam to Vinod Tawade

सातारा : राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज आक्रमकपणे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल जाब विचारून कारवाईची मागणी केली. तावडे यांनी हा विषय गृह खात्याचा आहे मी आपल्या भावना मुख्यमंत्री यांना कळवितो. त्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले.

साताऱ्यात एका कार्यक्रमा निमित्त आलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. दहीहंडी उत्सवाच्या काळात भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सकळीडूनच टिकेची झोड उठवली जात आहे. कदम यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणीही महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. अशा वेळी विनोद तावडे यांच्या पक्षाचे आमदार असलेले राम कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तावडे यांच्याकडे करण्यात आली. 

तावडेनींह प्रकरणाचे गार्भीर्य पाहून, आपल्या अंगावर न घेता या प्रकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात ढकलला आहे. राज्याचे गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. मी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवतो असे केवळ आश्वासन तावडे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com