esakal | 'दरेकरांची पक्षातून हकालपट्टी करा'; 'NCP'च्या महिला आघाडी आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

'दरेकरांची पक्षातून हकालपट्टी करा'; 'NCP'च्या महिला आघाडी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी समस्त महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला आहे.

'दरेकरांची पक्षातून हकालपट्टी करा'; 'NCP'च्या महिला आघाडी आक्रमक

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन केले.

हेही वाचा: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

प्रविण दरेकर यांनी शिरूर इथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त 'जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला हे वक्तव्य केलं आहे. याचा निषेध म्हणून सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र महिलांतर्फे जिल्हापरिषद समोरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जोडेमारा आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा अध्यक्ष डॉ. छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारा आंदोलन झाले.

हेही वाचा: IPL 2021: "विराटच्या RCB ला जर स्पर्धा जिंकायची असेल तर..."

यावेळी डॉ. छाया जाधव म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी समस्त महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला आहे, अशा या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा, अन्यथा विधानभवनासमोर आंदोलन करु, असा इशाराही यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. ज्योती आदाटे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, वैशाली कळके, अमृता चोपडे, जसबीत खांगुरा, जयश्री भोसले, उषा पाटील, आशा पाटील, प्रणिती हिंग्लजे, प्रियंका तुपलोंढे, संध्या आवळे, शकुंतला हिंगमिरे, पूजा कोलप, वंदना सूर्यवंशी, शोभा झेंडे, वैशाली सूर्यवंशी, रंजना वावळ, रेश्मा मकानदार आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top