वाढत्या महागाई विरोधात सोलापूरात शहर राष्ट्रवादीची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

'पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करा', 'महागाई हाय.. हाय..', 'इंधन दरवाढ कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा', 'बहोत हुई महंगाई की मार, बस भी करो मोदी सरकार', 'गोरगरीब जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'क्या हुआ तेरा वादा? वो कसम वो इरादा?' आदी या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना याकडे डोळेझाक करणार्‍या सत्ताधारी पक्षाच्या नावाने यावेळी ओरड करण्यात आली. 'पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करा', 'महागाई हाय.. हाय..', 'इंधन दरवाढ कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा', 'बहोत हुई महंगाई की मार, बस भी करो मोदी सरकार', 'गोरगरीब जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'क्या हुआ तेरा वादा? वो कसम वो इरादा?' आदी या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 

केंद्रात व राज्यात भाजपचे  सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. सरकार कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकलेले नाही. विकासाच्या बाबतीत जाहिरातीद्वारे सतत दाखविण्यात येत असलेल्या खोट्या आकडेवारीमुळे सर्वसामान्य जनता सत्ताधार्‍यांवर नाराज आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी दर असताना देखील देशात भाव वाढ झालेल्या दरानेच पेट्रोल विक्री चालू आहे. पेट्रोल जवळपास ८६ रुपये, डिझेल ७२ तर घरगुती गॅस स्मरे ८५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर उतरल्यावर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणे अपेक्षित होते.

सत्ताधार्‍यांनी आंतराष्ट्रीय बाजारपेठेते पेट्रोल, डिझेलचे भाव कमी-जास्त होत असताना देखील भाव वाढ सुरुच ठेवली आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र झाल्यानंतर काही पैशांनी भाव वाढ कमी करुन, मोठा दिलासा दिल्याचा आव सत्ताधारी आणत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने यावेळी करण्यात आला. महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल व डिझेल भाव वाढीने त्यात आणखी भर पडली आहे. ही फसवणूक थांबून सर्वसामान्य जनतेचा भावनेचा आदर करत पेट्रोल, डिझेलचे दरवाढ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे. या सर्व मागणीचे निवेदन महसूल उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी गटनेते किसन जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे,सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू कुरेशी, महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर, शहराध्यक्षा सुनीता रोटे, नगरसेविका सुवर्णा जाधव, लता फुटाणे, राजन जाधव, विठ्ठलसा चव्हाण, किरण पवार, चंद्रकांत पवार, आनंद मुस्तारे, राम साठे, जावेद खैरदी, महेश निकंबे, अमीर शेख, प्रमोद भोसले, राजेश अच्युगटला, दिलावर मणियार, जनार्दन बोराडे, सुहास कदम, सर्जेराव पाटील, अहमद मासुलदार, फारुख मटके, महंम्मद इंडीकर, चिंतामणी सपाटे, संतोष कासे, संजय सरवदे, संजय पाटील, डॉ. दादाराव रोटे, अनिल उकरंडे, अल्ताफ कुरेशी, बालाजी मास, गब्बर सय्यद, युनूस मुर्शद, दौला कुरेशी, याकूब कुरेशी यांच्यासह लता ढेरे, सुंनदा साळुंखे, सिया मुलाणी, जयश्री पवार, मनीषा नलावडे, आशालता दीक्षित, संगीता राठोड, किरण मोहिते, सुनीता गायकवाड, अश्विनी भोसले, शशिकला ढंगापुरे, अप्सरा शेख, माधुरी चव्हाण तसेच तनवीर गुलजार, शिवराज विभुते, प्रकाश जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महागाई प्रचंड वाढली -
अर्ध्या किमतीत पेट्रोल आणि डिझेलची विदेशात निर्यात करून स्वदेशीचा ढोल बडवणाऱ्या भाजप सरकारकडून देशातील जनतेला वेठीस धरण्यात येत आहे. भरमसाठ कर आकारणी करून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची विक्री करण्याचा प्रकार निंदनीय असून जनहित विरोधी संवेदना नसलेल्या खोटारड्या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. दिवसेंदिवस इंध दरवाढ होतच आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकूणच मोदी सरकारच्या काळात देशातील जनता गरिबीच्या खाईत लोटली गेली असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले. 

'अच्छे दिन' चे गाजर मिळालेच नाही -
भाजप सरकारने सत्तेवर येऊन गेल्या चार वर्षात नुसती जुमलेबाजी केली. खोटे आकडे सादर करून महागाई घटल्याचा खोटा आव आणला आणि देशभरातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. मोदी सरकारकडून 'अच्छे दिन'चे गाजर दाखविण्यात आले. इंधनाचे दर दररोजच वाढत आहेत. भाजप सरकारने सामान्य जनतेला असह्य करून टाकले आहे. सुरवातीला भरमसाठ इंधन दरवाढ करायची आणि नागरिकांच्या भावना तीव्र झाल्यानंतर काही पैशांनी भाववाढ कमी करून मोठा दिलासा दिल्याचा आव सत्ताधारी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs agitation against the rising inflation in the city of Solapur