भारतात दरमहा दहा लाख नोकऱ्या हव्यात - संजय किर्लोस्कर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

कुंडल - भारतात दर महिन्याला दहा लाख नोकऱ्या निर्माण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले.

कुंडल - भारतात दर महिन्याला दहा लाख नोकऱ्या निर्माण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले.

किर्लोस्करवाडी येथे विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आदर्शवत शाळा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. सहायक धर्मादाय आयुक्‍त राजेश परदेशी प्रमुख पाहुणे होते. किर्लोस्कर म्हणाले, ‘‘भारताच्या लोकसंख्येचा  विचार केला तर दर महिन्याला १० लाख नोकऱ्या तयार व्हायला हव्यात. त्या प्रमाणात होत नाहीत. औद्योगिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. रोबोज मशीनरी येत आहे.  एका रोबोमुळे सहा लोक कमी होतात. मात्र, स्पर्धेत टिकायचे तर या सर्व टेक्‍नॉलॉजीचा अवलंब करावाच लागेल.’’ 

ते म्हणाले, ‘‘सरकार, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन ४०-५० वर्षांचे नियोजन करायला पाहिजे. नवीन यांत्रिकीकरणाचा अवलंब केलाच पाहिजे. पण त्याबरोबर नवीन नोकऱ्या तयार केल्या पाहिजेत. केवळ कंपन्या मोठ्या होत आहेत.’’ 

परदेशी यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलती आव्हाने व शिक्षकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष संजय वडनेरकर, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुनील नायर, ट्रस्टचे विश्‍वस्त व सी. एच. आर. एम. सी. विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट रवी सिन्हा, रवींद्र बिराजदार, विश्‍वस्त रमा किर्लोस्कर, सचिव डी. बी. निंबाळकर, सुभाष जाधव, युनियनचे भगवान बारगीर, रमेश जोशी, डॉ. राजन कामत उपस्थित होते. उदय कुलकर्णी, मनीषा शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. विकास ट्रस्टचे अमोल जोशी, अर्चना लाड, व्ही. बी. कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. विद्याधिकारी विवेक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: ndia should ten million jobs per month