मालेजवळ अपघातातील जखमी दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

मृतांची संख्या अकरा - उर्वरित 21 जखमींची प्रकृती स्थिर; सादळेत स्मशानशांतता
हातकणंगले - कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले (ता. हातकणंगले) फाट्यावर जीप ओढ्यात कोसळून काल (रविवार) झालेल्या अपघातातील आणखी दोघांचा आज मृत्यू झाला. शालाबाई रघुनाथ चौगुले (वय 60) व वसंत जोती चौगुले (60रा. मादळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. अपघातातील मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. उर्वरित 21 जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मादळे गावातील व्यवहार आजही पूर्णपणे ठप्प होते. दिवसभर गावात नीरव शांतता होती.

मादळे येथील बिडकर, पोवार, चौगुले कुटुंबीय नातेवाइकांच्या रक्षाविसर्जनासाठी काल इचलकरंजीला गेले होते. तेथून दुपारी सर्व जण जीप (एमएच09 डब्ल्यू6388) मधून मादळे गावी परतत असताना चालक अशोक बिडकरचा ताबा सुटल्याने जीप माले फाट्यानजीक ओढ्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून ओढ्यात कोसळली. या अपघातात चौघे जागीच ठार तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 9 जण ठार तर 23 जण जखमी झाले होते.

जखमींचे नातेवाईक आज दिवसभर सीपीआरमध्ये ठाण मांडून होते. जखमीपैकी वसंत चौगुले व शालाबाई चौगुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज दिवसभर गावात नीरव शांतता असून व्यवहार ठप्प होते.
हातकणंगले पोलिसांनी दिवसभर जखमींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. चालक अशोक बिडकर अद्याप बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांचा जबाब घेता आलेला नाही. त्यामुळे अजूनही याप्रकरणी पोलिसांनी कोणावरही गुन्हा नोंद केलेला नाही.

Web Title: Near Malegao accident 2 death and injured