नाथपंथी डवरी समाजातील सुशिक्षितांनी पुढे यायला हवे- सुशिलकुमार शिंदे

हुकूम मुलाणी
गुरुवार, 5 जुलै 2018

ग्रामीण भागात विखुरलेल्या ठिकाणी रहात नाथपंथी डवरी समाजाचे सर्वेक्षण स्वखर्चाने करायला तयार व त्यासाठी समाजातील सुशिक्षितांनी पुढे यावे. जेणेकरून समाजाचे प्रश्न आणि वास्तव्याचे ठिकाण, लोकसंख्या याची माहिती होईल त्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करता येईल असे प्रतिपादन माजी केद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा - ग्रामीण भागात विखुरलेल्या ठिकाणी रहात नाथपंथी डवरी समाजाचे सर्वेक्षण स्वखर्चाने करायला तयार व त्यासाठी समाजातील सुशिक्षितांनी पुढे यावे. जेणेकरून समाजाचे प्रश्न आणि वास्तव्याचे ठिकाण, लोकसंख्या याची माहिती होईल त्यानंतर त्याबाबत पाठपुरावा करता येईल असे प्रतिपादन माजी केद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

धुळे हत्याकांडातील मृत पाच कुटुंबातील नातेवाईकाना प्रत्येकी पंचवीस हजाराची मदत खवे व मानेवाडी येवून दिली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भिक्षापात्र मागायला आलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गरीब कुटूंब कर्त्याची हत्या केली. यातील गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे, सत्ता नसली तरी चालेल त्यांना वठणीवर कसे आणायचे हे माहित आहे. पण या सरकारचे काय चाललय हेच कळेनासे झाले आहे. माणूसकी सोडून सारे काही चालू आहे. या समाजातील कुटूंब कर्त्यांनी भले अर्ध पोटी राहिले तरी चालेल पण मुलाला शिकवा. भिक्षा मागण्यासाठी मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून सोबत नेण्याऐवजी ज्या गावात भिक्षा मागताय त्याच गावात त्याला शिक्षण देवून सुशिक्षित करण्याचे आवाहन माजी मंत्री शिंदे यांनी केले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजी काळुंगे, तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, नगरसेवक चेतन नरोटे, युवराज गडदे, मच्छिद्र भोसले, भेरू भोसले, मारूती भोसले आदीसह मृत कुटूंबाचे नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: need to educated people come forward in Dwari community says sushilkumar shinde