रायगडच्या धर्तीवर कोल्हापूर, सांगलीसाठी हवे स्वतंत्र प्राधिकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सांगली - महापुराचे महाभयानक संकट येऊ नये याकरिता रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर कोल्हापूर, सांगलीसाठी स्वतंत्र प्राधिकरण हवे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्र सक्षम करणे हा देखील चांगला पर्याय आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सांगली - महापुराचे महाभयानक संकट येऊ नये याकरिता रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर कोल्हापूर, सांगलीसाठी स्वतंत्र प्राधिकरण हवे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्र सक्षम करणे हा देखील चांगला पर्याय आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सांगलीमध्ये विमानतळाची धावपट्टी गरजेची असून, त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

सांगलीत महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी संभाजीराजे छत्रपती आले होते. त्यानंतर त्यांनी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदी उपस्थित होते. 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘सांगली, कोल्हापूरला सातत्याने पुराचा फटका बसतो आहे. या परिस्थितीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना एकत्र आणून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी सांगली, कोल्हापूरसाठी स्वतंत्र प्राधिकरण झाले पाहिजे. केंद्र केवळ नावालाच असू नये याची दक्षता सर्वांनीच घेणे आवश्‍यक आहे. महापुरात प्रशासनासह यंदा सामाजिक संस्था सक्रिय झाल्याचा सकारात्मक बदल आहे. माझ्या खासदार फंडातील पाच कोटी रुपये पूरग्रस्तांसाठी त्यातही वॉटर सिस्टीमकरिता दिले आहेत. महापुराचा अंदाज प्रशासनासह कोणालाच आला नाही. चुकांवर चर्चेपेक्षा भविष्यात आपण काय करु शकतो याचा विचार केला पाहिजे.’

ते म्हणाले, ‘‘सांगलीला विमान अथवा हेलिकॉप्टर उतरण्यासाठी धावपट्टी नाही. साहजिकच यामुळे सांगलीपेक्षा कोल्हापूरला मदत लवकर पोहोचली. यामध्ये सैन्यदलाच्या बोटींचा देखील समावेश होता. विमानतळ नसले तरी निदान धावपट्टीसाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याबाबत मी स्वत; मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. प्रामुख्याने खाजगी विमा कंपन्या गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need of An independent authority for Kolhapur, Sangli SambhajiRaje demand