Sugarcane harvesters and tractor owners in Nerle halt operations in support of farmers demanding fair sugarcane prices.
esakal
नेर्ले ; ऊसदराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला नेर्ले येथे मोठा पाठिंबा मिळत असून, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या जाहीर सभेनंतर ऊसतोडणी करणारे युवक तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक-मालक यांनी आज ऊसतोडणी व वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.