जायकवाडी पाण्याच्या संघर्षाचा 'भडका' नेवाशातून उडणार 

newasa
newasa

नेवासे : मुळातून जायकवाडीत जवळपास दोन टीएमसी पाणी सोडण्याच्या शासनाच्या निर्णयावर विचार विनिमय करुन आगामी भूमिका ठरविण्यासाठी सोनई येथे तालुक्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा तसेच तातडीचा मेळावा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यांनी आयोजित केला आहे. सत्तेत असो-नसो पाटपाणी प्रश्नावर माजी आमदार गडाख हे गंभीर असतात. हे त्यांच्या अनेक टोकाच्या आंदोलनातून सिध्द झालेले आहे. त्यामुळे आज त्यांनी ठेवलेल्या तातडीच्या शेतकरी मेळाव्यात ते नक्की काय भूमिका घेतात. याकडे जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जायकवाडीत सोडलेल्या 'पाण्याचा भडका सर्वात आधी नेवाशातून उडणार असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे. 

दरम्यान, माजी आमदार शंकरराव गडाखांनी जायकवाडी धरणात मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत वरीष्ठ पातळीवरुन सुरु असलेल्या हालचालींची यापूर्वीच दखल घेतली होती. त्यांनी ता. 12 ऑक्टोबरला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला लेखी निवेदन देऊन मुळा धरणातून पाणी सोडण्याला विरोध दर्शवला होता. त्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवालाही त्यांनी निवेदनात देऊन मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडू नये अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र या पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्याच्या राजकारणासाठी वरीष्ठांच्या दबावाला बळी पडत नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केल्याने त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना व्यक्त केलेली खंत पाटपाण्यावर तालुक्यात आगामी काळात होणारा संघर्ष सांगून जाते. 

दरम्यान, नेवासे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला स्थगिती आणल्याचच्या बिम'गर्जना गेल्या आठवड्यापासून करत असल्याने त्याकडे गडाखांनी लक्ष वेधत मुरकुटेंनी केलेल्या वल्गना म्हणजे त्यांचा निव्वळ राजकीय फार्स असल्याचे तालुक्यातील जनतेला कळून चुकले असून आमदार मुरकूटेंच्या दुतोंडीपणाची आता तालुक्याला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे त्यांनी म्हंटले. जायकवाडीत पाणी सोडण्याचा त्यांच्याच सरकारचा निर्णय त्यांना माहित असतानाही वस्तुस्थिती झाकून ठेवत जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

हा निर्णय उच्च न्यायालयाला डावलून : शंकरराव गडाख
"मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला डावलून आहे. यामुळे नेवासे तालुक्यातील लोकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबत आता कोणती भुमिका घेतली पाहिजे यावर विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com