नेवासे : आमदार मुरकुटेंना झेंडावंदनाला रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई

सुनील गर्जे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नेवासे : स्वातंत्र्य दिनी नेवासे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला झेंडावंदन कार्यक्रमाला रोखण्यासाठी आलेल्या सकल मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या आठ आंदोलनकर्त्यांना नेवासे पोलिसांनी बुधवार (ता. 15) रोजी सकाळी सहा वाजता साखळी उपोषणस्थळावरून प्रतिबंधक कारवाई करत ताब्यात घेतले. यावेळी आमदार मुरकुटेंचा धिक्कार असो.. घोषण आंदोलकांनी दिल्या. मोठ्या पोलिस बंदोबस्तातच आजचा शासकीय ध्वजारोहणाचा कार्येक्रम पार पडला. दरम्यान, दुपारी आंदोलकांची सुटका करण्यात आली. 

सकल मराठा, धनगर व मुस्लीम समाज आरक्षणासाठीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली म्हणून स्वातंत्र्य दिनी नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना शासकीय झेंडावंदन कार्येक्रमापासून रोखणार असा इशारा देणाऱ्या आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना नेवासे पोलीसांनी साखळी उपोषण स्थळी येऊन बुधवारी सकाळीच आंदोलक अनिल ताके, भाऊसाहेब वाघ, युसुफ बागवान, पोपट जीरे, बालेंद्र पोतदार, अभिजित मापारी, अॅड. सादिक शिलेदार, राजेंद्र साठे यांना ताब्यात घेतले. शिलेदार व साठे यांनी संविधान आवमान प्रकरणी निषेध म्हणून यावेळी लोकप्रतिनिधींना काळे झेंडे दाखवले होते. 

दरम्यान, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक अॅड. बापूसाहेब गायके, नगरसेवक लक्ष्मण जगताप, अॅड. कारभारी वाखुरे, दिपक धनगे, संभाजी माळवदे यांनी पोलिस व महसूल प्रशासनाशी चर्चा करत आंदोलकांची सुटका करण्याची मागणी केली. कार्येक्रमानंतर आमदार मुरकुटे कार्यक्रमस्थळावरुन निघून गेल्यावर आंदोलकांची मुक्तता करण्यात आले.     

आंदोलकांनविरोधात सूडबुद्धीनेच कारवाई : अनिल ताके 
आमदार मुरकुटेंनी जाणिवपूर्वक सकल समाज आरक्षणासाठीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. याचा जाब त्यांना विचारण्यासाठी आमचे लोकशाही मार्गाने होते. मात्र त्यांनी पोलीसांकरवी सकल मराठा, धनगर, मुस्लीम समाजाच्या आंदोलकांनविरोधात सूडबुद्धीनेच कारवाई केली. असल्याचा आरोप आर्स्कहण कृती समितीचे समन्वयक अनिल ताके यांनी केला.  

Web Title: nevase - police took action on some people