दोन कृषिपंपांसाठीही मिळणार नवा डीपी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सोलापूर - वीज महावितरण मंडळाने आता दोन कृषिपंपांसाठी एक नवा डीपी (ट्रान्स्फॉर्मर) देण्याचे नियोजन केले असून, त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या, परंतु प्रत्यक्षात जोडणी न झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर दिला जाणार असल्याचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी सांगितले. 

सोलापूर, सातारा जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमधील सुमारे ३२ हजार कृषिपंपासाठी पहिल्या टप्प्यात स्वतंत्र वीज जोडणीची व्यवस्था करण्यात येणार असून, त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठ्याच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका होईल, असे इरवाडकर म्हणाले.

Web Title: new DP for agriculture pump