बैलगाडीतून वरात काढून नवरीला घरी नेले

हुकूम मुलाणी 
बुधवार, 9 मे 2018

मंगळवेढा (सोलापूर) : सध्याच्या काळातील नवरदेव नवरीला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणत आलिशान गाडयातून आपल्या घरी घेऊन जाताना दिसतात पण मंगळवेढयातील बाबर कुटूंबियांतील लग्न सोहळ्यातील वरातीमधून नवरदेवांनी नवरीला चक्क बैलगाडीतून वाजत गाजत घरी नेले. ही वरात जुन्या आठवणीला उजाळा देणारी ठरल्याने शहरातील नागरिकांनी रस्त्यालगत गर्दी केली.  

लग्न म्हणजे दोन जीवाचे व कुटूंबाचे मिलन असल्याने या सोहळ्याला विशेष महत्व असते. सध्या काळातील लग्नसराई खर्चीक होत असताना केवळ हौस म्हणून खर्चाचा विचार न करता लग्न मात्र चांगले झाले पाहिजे यावर दोन्ही कुटूंबे ठाम असतात. लग्नातील वरात डिजे बॅजो बँडसह फटाक्याची आतषबाजी करण्यावर भर असतो. लग्नातील वरातीमध्ये मोठ्या धामधुमीत डिजेच्या आवाजात करुन तरुणाईची पावले बेधुंद होऊन संगीताच्या तालावर थिरकली. यामुळे जुन्या चालीरिती परंपरा लोप पावत चालली येथील गोविंद बाबर यांच्या मुलाचा कर्नाटकातील मुधोळ येथील मुलीशी होणारा विवाह लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात पार पडला हा विवाह सोहळा जुन्या पध्दतीने साजरा केला लग्नानंतरची वरातही चक्क बैलगाडीतून डी जे बॅन्डला फाटा देत वाजंत्रीच्या ताफ्यातून वाजत गाजत काढत जुन्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.  

शिवाय आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीचे प्रदुषणासह अनावश्यक खर्चाला फाटा दिला असला तरी जुन्या काळातील लग्नातील धामधुम कशी असते याला उजाळा देण्याचा प्रयत्न बाबर कुटूंबियांनी केला बैलगाडीतून काढलेली मिरवणुक मंगळवेढयातील प्रमुख रस्त्यावरुन जाताना उपस्थितांचे डोळे दिपावणारे ठरले जुन्या काळातील आठवणीला उजाळा मिळाल्याने शहरातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

वडीलांची इच्छा होती मुलाचे लग्न जुन्या व पारंपारीक पद्धतीने करावे म्हणून जुन्या पद्धतीने करुन जुन्या आठवणी अलिकडच्या तरुणाईला मॉडर्न कितीही झालो जुनं ते सोने असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. 

- गोंविद बाबर, नवरदेव

Web Title: new married couple arrives in bullock cart