धावपटूंनो...सातारा हिल मॅरेथॉनचा नवा मार्ग घाेषित

धावपटूंनो...सातारा हिल मॅरेथॉनचा नवा मार्ग घाेषित

सातारा : सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार ता. 25 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंसह सुमारे आठ हजारहून अधिक धावपटू साताऱ्यातील रस्त्यांवरुन धावणार आहेत. गतवर्षी पोवई नाका येथे सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे या स्पर्धेचा प्रारंभ तालीम संघ मैदानापासून करण्यात आला होता. यंदा ही स्पर्धा पुर्वीप्रमाणेच पोलीस कवायत मैदान येथून सुरु होईल. धावपटू पोवई नाकामार्गे कर्मवीर पथावरुन (खालचा रस्ता) पोलिस मुख्यालय, शेटे चौक तेथून कमानी हौद, राजपथावरुन मोती चौक, गोलबाग, यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्यापुढे दोनशे मीटरपर्यंत जातील. पून्हा त्याचमार्गे यवतेश्वर घाटातून समर्थ मंदिर, अदालत वाडा, केसरकर पेठ, शाहू चौक, बगाडे हॉस्पिटल, रविवार पेठ पोलिस वाहतूक शाखेपासून खाली वळून खालच्या रस्त्याने पोवई नाका व तेथून पुन्हा पोलिस कवायत मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग राहिल अशी माहिती रेस डायरेक्‍टर डॉ. देवदत्त देव यांनी दिली. मॅरेथॉन मार्गावर आठ ठिकाणी स्पर्धकांसाठी मदत केंद्रे असतील. गीते बिल्डिंग, यादोगोपाळ पेठ, बोगदा, यवतेश्वर घाट, साईबाबा मंदिर, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या अलीकडे, टर्न अराऊंड व आठवे मदत केंद्र अदालत वाड्याजवळ असेल. स्पर्धेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सातारा रनर्स फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व सचिव जितेंद्र भोसले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com