मोहोळमध्ये शेतकर्‍यांसमोर नवे संकट

मोहोळमध्ये शेतकर्‍यांसमोर नवे संकट

मोहोळ : हुमणीबरोबरच  मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला आता बुडका कांडी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हे नवीनच संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू होताच हा बाधीत ऊस गाळपासाठी गेला तरच शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल, अशी माहिती मांजरी  येथील वसंतदादा ऊस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिली.

तालुक्यातील ऊसाला हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर या बाबत 'सकाळ'ने वेळोवेळी आवाज उठविला होता. त्याची दखल घेत टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखान्याने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी व शेतकरी उपाययोजनासाठी मांजरी येथील वसंतदादा ऊस संशोधन केंद्रातील सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे बी जी माळी व किटक शास्त्र विभागाचे डॉ. तुषार शितोळे या शास्त्रज्ञांना पाचारण केले  होते.

या दोघा शास्त्रज्ञांनी तालुक्यातील पापरी, खंडाळी ,येवती ,पेनूर, पाटकुल आदी गावातील हुमणी बाधीत क्षेत्राच्या विविध शेतकऱ्यांच्या सुमारे शंभर एकराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. त्यांच्या समवेत कारखान्याचे ऊस विकास अधिकारी अभिजीत चौधरी, चिटबॉय शिवाजी घागरे ,राम कदम  पाहणीत सहभागी झाले होते.

शास्त्रज्ञ माळी व शितोळे यांनी जास्तीत जास्त बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून त्यांना उपाययोजना सांगितल्या. यावेळी शास्त्रज्ञ माळी म्हणाले, ''खोडवा ऊसाचे ऐंशी टक्के ,तर लागणीच्या ऊसाचे सत्तर टक्के नुकसान हुमणीमुळे झाले आहे . हुमणी तर आहेच, पण ऊसाला बुडका कांडी किडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या दोन्ही रोगाच्या उपाययोजना व प्रबोधनासाठी, शास्त्रज्ञांसह अन्य शेती़ विभागाच्या कर्मचाऱ्यांची विविध पथके राज्यभर फिरत आहेत.

हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्ही. एस. आय. ने द्रवरूप औषध निर्माण केले असून, संपूर्ण राज्यभर कारखान्याच्या माध्यमातून तीस हजार लिट चा पुरवठा केला आहे. अद्यापही  वीस हजार लिटरची मागणी आहे 

शेतकऱ्यांनी क्लोरोपायरी फॉस वीस टक्के प्रवाही हे औषध एकरी दोन लिटर चारशे लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
- बी. जी. माळी (संशोधन अधिकारी, सुक्ष्म जीवशास्त्र विभाग, व्ही एस आय)

शेतकऱ्यांनी हुमणीची काळजी ही जुन पासून घ्यावी जमिनीचा कर्ब चांगला ठेवावा औषध देण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. तुषार शितोळे (संशोधन अधिकारी किटक शास्त्र विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com