

जयंत पाटलांच्या साखर कारखान्याच्या नावबदल प्रकरणी नवी अपडेट
esakal
Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अनोळखी व्यक्तींनी शुक्रवारी (ता. २४) पहाटे बदलल्याची घटना घडली. प्रवेशद्वारावरील कमानीवर असलेले राजारामबापू पाटील नावाऐवजी ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ अशा नावाचा फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याची खबरदारी म्हणून कारखान्याचे सुरक्षारक्षक प्रकाश पाटील यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.