esakal | मंगळवेढा तालुक्‍यातील कॉंग्रेस का गेली कोमात 
sakal

बोलून बातमी शोधा

congress

10 वर्षांपासून कॉंग्रेसच्या नेत्यांनी फक्त निवडणुकीपुरते ग्रामीण भागातील मतदारांना गृहीत धरले. मात्र, त्यानंतर मतदारांशी कसलेही संबंध ठेवले नाहीत. पाच वर्षांत आमदार भालके यांच्या रूपाने कॉंग्रेसला सक्षम चेहरा मिळाला. परंतु, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या दुर्लक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी हा चेहरा गमावला. आमदार भालके यांना विरोधकांबरोबर कॉंग्रेसच्या अंतर्गत वादाचा सामना करावा लागला.

मंगळवेढा तालुक्‍यातील कॉंग्रेस का गेली कोमात 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाने महाआघाडीची सत्ता अस्तित्वात आली. परंतु, सत्तेच्या अस्तित्वानंतर मंगळवेढ्यातील कॉंग्रेसला या सत्तास्थापनेचा आनंद उपभोगता आलेला नाही. आमदार भारत भालकेंनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कॉंग्रेसची बांधणी करण्यासारख्या नेतृत्वाचा अभाव असल्याने मंगळवेढ्यातील कॉंग्रेस सत्तास्थापनेनंतर कोमात गेली. 
हेही वाचा- (व्हिडिओ) : करमाळ्याचा हॉकीपटू करतोय श्रीगोंद्यात रोजंदारी 
निर्णय अद्याप गुलदस्त्यात 

तालुक्‍यात कॉंग्रेसला मानणारा विशिष्ट वर्ग आहे. परंतु, 10 वर्षांपासून कॉंग्रेसच्या नेत्यांनी फक्त निवडणुकीपुरते ग्रामीण भागातील मतदारांना गृहीत धरले. मात्र, त्यानंतर मतदारांशी कसलेही संबंध ठेवले नाहीत. पाच वर्षांत आमदार भालके यांच्या रूपाने कॉंग्रेसला सक्षम चेहरा मिळाला. परंतु, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या दुर्लक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी हा चेहरा गमावला. आमदार भालके यांना विरोधकांबरोबर कॉंग्रेसच्या अंतर्गत वादाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या कॉंग्रेसकडे जनमत असणारा प्रभावी नेता नाही. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी बंडखोरी केल्याच्या कारणावरून त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे वृत्त सोशल मीडियातून प्रसारित केले. पण प्रत्यक्षात कारवाई केली किंवा नाही हा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रा. शिवाजीराव काळुंगेंनी ग्रामीण भागात धनश्री परिवारच्या माध्यमातून तालुक्‍यात कॉंग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले. परंतु विधानसभा निवडणुकीपासून तेही पक्षापासून दुरावलेले आहेत. पाच वर्षांपासून तालुक्‍यात नवीन कॉंग्रेसच्या शाखेचा फलक पाहण्यास मिळाला नाही. तालुक्‍यात बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्‍वर यांचे स्मारक, ग्रामीण भागातील नादुरुस्त रस्ते, उजनी कालव्याची अर्धवट कामे, दुष्काळ निधी, रब्बी पीकविमा यासह अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीमुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील रखडलेल्या प्रश्‍नाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहेत. यासाठी तालुक्‍यातील मतदार नेत्याकडून प्रयत्नाच्या दृष्टीने आशावादी आहेत. परंतु, तालुक्‍यात कॉंग्रेसला उभारी देऊ शकणारा चेहरा सध्या तरी अस्तित्वात नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या जागा आणि सत्तेत मिळालेला वाटा यावर साधा जल्लोष देखील मंगळवेढ्यात करण्यात आला नाही. 

हेही वाचा- सोलापूर जिल्ह्यात दोन अपघात 
अध्यक्षपदासाठी जाहीरात 

आमदार प्रणिती शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून कॉंग्रेसचे आपण किती निकटचे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जणूकाही नोकर भरतीची जाहिरात असल्यासारखे तालुका कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार नियुक्त करणार असल्याचे सांगून संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणार की प्रत्यक्ष कामावर निवडणार हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे.

loading image